धावत्या गाडीचा टायर फुटल्याने अपघात

वणी-वरोरा बायपासवरील घटना, चार जण जखमी

0

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथून वरोरा बायपासने जात असलेल्या एका चारचाकी वाहनाचा रेल्वे क्रॉसिंग जवळ गाडी उलटून अपघात झाला. 10 ऑगस्ट सोमवारी 5 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. चारही जखमींना चंद्रपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

घुग्गुस येथील रहिवासी असलेले विजय श्याम (38), प्रवीण वाघमारे (38), मनीष पानघाटे (32), व जीवने हे सर्व वणीला काही व्यक्तिगत कामानिमित्त आले होते. सोमवारी सायंकाळी 5 वाजत ते चिखलगाव बायपासवरून वरोरा बायपासने त्याची गाडीने (MH49BB-184) परत जात होते.

रेल्वे क्रॉसिंगजवळ अचानक त्यांच्या गाडीचा टायर फुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. अपघातात गाडीतील चारही जण जखमी झाले आहेत. अपघातात गाडीचे फार नुकसान झाले. तर जखमींना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.