दुचाकीच्या धडकेत एक ठार तर दोन गंभीर जखमी

झरी ते पाटण मार्गावरील बिरसाईपेठ फाट्याजवळील घटना

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ते झरी या मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एक दुचाकीस्वार जागीच ठार तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना १७ ऑगष्टला सायंकाळी पावणे चार वाजताच्या सुमारास घडली.

झरी ते पाटण मार्गावरील बिरसाईपेठ फाट्या जवळ भरधाव व विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 29 X 1677 व AP 01 AG7438 या दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. दुचाकीस्वार ‘सदाशिव लाला चव्हाण (४८) रा. तहेली तांडा ता. केळापूर ‘ हा जागीच ठार झाला. त्या सोबत गाडीवर असलेली रामबाई बापूराव आत्राम (५५) रा. माथार्जुन’ ही महिला गंभीर जखमी झाली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वार विलास रामकिष्टु नाग्रतवार (४०) रा.खरबळा हा गंभीर जखमी झाला. दोन्ही दुचाकीची धडक भीषण असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशांकडून मिळाली.

सदर घटनेची माहिती पाटण पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस कर्मचारी श्यामसुंदर रायके, संदीप सोयाम, संतोष खापणे, ज्ञानेश्वर सोयाम, इरफान शेख आले. त्यांनी प्रथम अॅम्बुलन्स बोलवली व जखमींना उपचारासाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यात ‘सदाशिव लाला चव्हाण’ याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमींची प्रकृती बघता त्यांना यवतमाळ येत पाठविण्यात आले. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश किन्नके जमादार श्यामसुंदर रायके व संदीप सोयाम करीत आहे.

Comments
Loading...
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!