जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग व्यवस्थापकाला मारहाण करुन 45 लाख रुपयांचा दरोड्याची घटनेला आठवडा उलटूनही वणी पोलिसांचे हात अजून रिकामेच आहेत. शेकडो सीसीटीव्ही फुटेज आणि वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेऊनही दरोडेखोरांचा थांगपत्ता नसल्याची बाब पूढे आली आहे. दरोड्यासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कार बाबतही पोलिसांना अजून सुगावा लागलेला नाही. फक्त 45 सेकंदामध्ये 45 लाखांचा दरोड्याच्या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे.
माहितीनुसार वणी येथील अनिल अग्रवाल यांच्या मालकीची इंदिरा एगजीम प्रा.लि. नावाने निळापूर रोडवर जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी आहे. जिनिंग व्यवस्थापक मनीष जंगले हे 20 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता बँक ऑफ इंडियातुन 45 लाखांची रोकड बॅगमध्ये घेऊन दुचाकीने जिनिंगमध्ये जात होते. दरम्यान जिनिंग निळापूर ब्राह्मणी रस्त्यावर अहफाज जिनिंग समोर मागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाची कारने मनीषच्या दुचाकीला धडक दिली.
धडक लागल्यामुळे मनीष हा दुचाकीसह खाली पडले. तेव्हा कारमधून खाली उतरून एका व्यक्तींनी मानिषचे तोंड दाबले तर दुसऱ्यांनी पैशानी भरलेली पिशवी हिसकून दोघे कारमध्ये बसून पळून गेले. घडलेल्या घटनेबाबत तात्काळ वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
दरोड्याची व्याप्ती लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील स्वतः वणीत आले. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात दरोडखोरांचे शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक वैभव जाधव यांचे नेतृत्वात पोलीस पथक तयार करण्यात आले. फिर्यादी जिनिंग व्यवस्थापक मनीष जंगले याचे बयाण, घटनास्थळ रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज, संशयित व्यक्तींची कॉल डिटेल या सर्व बाबींच्या साहाय्याने पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
प्राथमिक चौकशीत दरोडेखोर राजस्थान येथील असल्याच्या संशय पोलिसांना आहे. मात्र घटनेनंतर सर्व संशयितांचे मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे पोलिसांना त्यांची लोकेशन घेणे अवघड होत आहे.
हे देखील वाचा:
वेळाबाई येथे विजेच्या खांबावरून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू