अखेर ‘त्या” चोरीतील आरोपींना चंद्रपूर कारागृहातून अटक

माजी कुलगुरू डॉ. चोपणे यांच्या घरात दोन वेळा केली चोरी

0

जितेंद्र कोठारी, वणी: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठचे माजी कुलगुरू यांच्या घरी दोनदा चोरी करून लाखों रुपयांचे दागिने व नगद रकमेवर हात साफ करणाऱ्या दोन सराईत चोरट्याना वणी पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी एका गुन्ह्याच्या प्रकरणात चंद्रपूर येथील कारागृहात आहे. या दोन्ही आरोपींना वणी पोलिसांनी चंद्रपूर न्यायालयात अर्ज करून आपल्या ताब्यात घेतले. दोन्ही आरोपीची न्यायालयातून पोलीस कस्टडी घेऊन चौकशी केली असता त्यांनी माजी कुलगुरु डॉ. चोपणे यांचे घरी चोरी केल्याची कबुली दिली.

प्राप्त माहितीनुसार नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे यांचे जगन्नाथ महाराज मंदिर जवळ घर आहे. दि. 29 ऑक्टो. 2019 रोजी रात्रीच्यावेळी अज्ञात चोरट्यांनी डॉ. चोपणे यांच्या कपाटातून रोख रक्कम व दागिने लंपास केले होते. चोरीच्या घटनेची पोलिस तपास सुरू असताना जानेवारी 2020 मध्ये चोरट्यानी दुसऱ्यांदा डॉ. चोपणे यांच्या घरात हात साफ केला. दुसऱ्या घटनेत चोरट्यानी पुन्हा लाखों रुपयांच्या मालमत्तेवर डल्ला मारला होता.

चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांना दोन्ही चोरी मध्ये चोरी करण्याची पद्दत सारखी असल्याचे दिसून आली. चोरट्यांची कार्यप्रणालीवर आपले लक्ष देऊन पोलिसांनी तपास सुरू केली. अखेर याच पद्दतने चोरी करणारे दोन सराईत चोरटे चंद्रपूर पोलिसांनी अटक केल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यावरून वणी पोलिसांचे एक पथक चंद्रपूर पाठविण्यात आले.

सदर दोन्ही आरोपी चंद्रपूर जेलमध्ये असल्यामुळे वणी पोलिसांनी चंद्रपूर न्यायालयात तपासकामी आरोपी मिळणे करीता अर्ज दाखल केला. न्यायालयातून परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी माजरी जि. चंद्रपूर येथील शाहरुख असलम शेख (22 वर्ष) व रकीब सिद्दीकी (22 वर्ष) याना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींना 14 ऑक्टो. रोजी वणी न्यायालयात हजर करून चार दिवसाचे पोलीस रिमांडवर घेण्यात आले. चौकशीत दोन्ही आरोपींनी डॉ. चोपणे यांचे घरी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेलं सिलेंडर, सीसीटीव्ही व इतर साहित्य जप्त केले आहे.

वणीचे तत्कालीन उप विभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणेदार वैभव जाधव यांच्या नेतृत्वात डीबी पथक प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, सुदर्शन वानोळे, रत्नपाल मोहोड, पंकज उंबरकर यांनी घटनेचा तपास करून प्रकरणाचा छडा लावला.

Leave A Reply

Your email address will not be published.