जितेंद्र कोठारी, वणी: मोटारसायकल चोरी प्रकरणी आरोपीला न्यायालयाने एका वर्षाची कासावासाची व 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीचे नाव चंदन सदर चौधरी असून त्याच्यावर नोव्हेंबर महिन्यात मोटारसायकल चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर प्रथम श्रेणी न्यायालय वणी यांनी निकाल देत आरोपीला शिक्षा सुनावली आहे.
मनोज तुळशीराम धगडी (37) रा.वेगाव ता. मारेगाव यांचे डोंगरगाव येथे शेत आहे. दिनांक 4 नोव्हेंबर रोजी त्यांनी त्यांच्या मालकीची (MH 34 BA 6966) पॅशन प्रो दुचाकी डोंगरगाव शेत शिवारात रस्त्याच्या कडेला लावली होती व ते शेतात कामासाठी गेले. दरम्यान अज्ञात चोरट्याने ती मोटरसायकल चोरी केली होती. दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांनी याबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून वणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवत अवघ्या दोनच दिवसात आरोपी चंदन सदन चौधरी (राहणार मुळचा उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे चोरी झालेली तसेच आणखी 2 मोटरसायकल आढळून आल्या होत्या.
पोलिसांनी आरोपीवर 379 अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले होते. या प्रकरणी दिनांक मंगळवारी दिनांक 30 मार्च रोजी प्रथम श्रेणी न्यायालय वणीचे न्याय दंडाधिकारी आर आर खामतकर यांनी आरोपीला एक वर्ष कारावास व 1 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आणखी 1 महिन्याची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून एसपी वानखेडे यांनी बाजू मांडली तर अशोक टेकाडे यांनी पेरवी म्हणून काम पाहिले.
हे देखील वाचा:
विक्रीसाठी अवैधरित्या दारुसाठा केल्या प्रकरणी 2 महिलांना अटक