शिंदोला व शिरपूर येथे दारूतस्करांवर कारवाई

सुमारे 45 हजारांची देशी विदेशी दारू जप्त

0

विवेक तोटेवार, वणी: शनिवारी दिनांक 20 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी वणीवरून चंद्रपूरला दारू तस्करी करणा-यांवर कार्यवाही केली. पहिली कार्यवाही शिंदोला येथे तर दुसरी कार्यवाही शिरपूर येथे करण्यात आली. या कार्यवाहीत सुमारे 45 हजारांची देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली असून वाहतुकीसाठी वापरली गेलेली एका कारही जप्त करण्यात आली आहे. या दोन्ही कार्यवाहीत 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कार्यवाही एसडीपीओ पथकाने केली आहे.

पहिली कार्यवाही ही शिंदोला फाट्यावर करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिंदोला फाट्यावर अवैध दारू विक्री होत असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शिंदोला चौपाटी येथे धाड टाकली असता बसस्थानकाजवळील पानठेल्या मागे आरोपी महेंद्र पंढरी राखुंडे (42) रा. शास्त्रीनगर वणी हा देशी दारूची विक्री करत असताना आढळला. पोलिसांनी त्याच्या जवळून 90 मिली क्षमतेच्या 200 देशी दारुच्या बाटल्स जप्त केल्या. याची अंदाजी किंमत 5200 रुपये आहे.

दुसरी कार्यवाही ही शिरपूर येथे करण्यात आली. पोलिसांना माहिती मिळाली की दोन व्यक्ती या वणी मार्गे लाल व्हेगनआर कारने (MH02 DA2889) चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी करीत आहे. रात्री 11 वाजताच्या सुमारास एसडीपीओ पथकाला या मार्गावरून सदर कार जाताना दिसली. पोलिसांनी कारला थांबवून झडती घेतली असता यात विदेशी दारूच्या 6 पेट्या आढळून आल्यात ज्याची किंमत 40 हजार 320 रुपये आहे. पोलिसांनी कार आणि दारू असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शिंदोला येथील कार्यावाहीत महेंद्र पंढरी राखुंडे (42) रा. शास्त्रीनगर वणी व मालक नागेश रामन्ना चिंतलवार (35) राहणार जैताई मंदिर जवळ वणी यांच्याविरोधात दारुंबंदी कायदा कलम 65 (ई) व सहकलम 109 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर शिरपूर येथील कार्यवाहीत मो. सोहेल मो. अखिल (26) रा. ताज नगर यवतमाळ व शेख खालिद शेख खालिल (22) रा. अमननगर यवतमाळ यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर दारुबंदी कायद्याच्या 65 (अ) (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात शिरपूरचे ठाणेदार सचिन लुले, नापोकॉ विजय वानखेडे, ईकबाल शेख, रवि इसनकर, आशिष टेकाडे, गुणवंत पाटिल, सुगत दिवेकर यांनी केली.

हे देखील वाचा:

सोशल मीडियावरील लॉकडाऊनच्या विविध आदेशामुळे संभ्रमाचे वातावरण

अल्पवयीन मुलगी रात्रभर घरीच आली नाही…

Leave A Reply

Your email address will not be published.