भास्कर राऊत, मारेगाव: गेल्या तीन दिवसांमध्ये तहसील कार्यालयाने केलेल्या कारवाईमध्ये एका हायवा वाहनावर तर दोन ट्रॅक्टर कारवाई करीत रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. यातील दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून एका वाहनावर कारवाई करणे सुरू होते.
तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दि. 8 डिसेंबरला उपविभागीय अधिकारी यांनी मारेगाव येथे मुरुमने भरलेले (MH 34 BG-9068) हे एक हायवा वाहन पकडले. या वाहनावर तहसीलदार मारेगाव यांनी 2 लाख 27 हजार 500 रुपये दंडाची कारवाई केली. दुसरी कारवाई काल दि. 12 डिसेंबरला दांडगाव घाटावर करण्यात आली. रमेश गणपत एकरे, रा. दांडगाव यांचे ट्रॅक्टर क्रमांक (MH 29- BD-4274) ट्रॉली (MH29 M 4926) हे दांडगाव घाटामध्ये रेती भरलेले असतांना रात्रीचे 12.15 वाजता मंडळ अधिकारी यांनी कारवाई केली. यामध्ये 1 लाख 30 हजार 400 रुपयांचा दंड आकारण्यात आला.
तिसरी कारवाई कोसारा घाटात करण्यात आली. यावेळी तहसील कार्यालयाचे वाहन येत आहे असे माहीत झाल्याबरोबर ट्रॅक्टर चालक ट्रॉली घाटातच सोडून समोरील ट्रॅक्टरच्या मुंडीला घेऊन पसार होण्यात यशस्वी झाला. यावेळी घाटात असलेली ट्रॉली (MH 29 –6583) ताब्यात घेत कारवाई करण्यात आली. ही कारवाई रात्री दोन च्या नंतर करण्यात आली. या कारवाई वेळी मंडळ अधिकारी आर.डी. कांडरकर, आर.एस.वरठे, तहसील कार्यालयाचा चालक विजय कनाके व सिपाही वेले उपस्थित होते.
रेती तस्करांचे धाबे दणाणले
सतत होत असलेल्या रेतीतस्करांवरील कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी होत असून याला तहसील कार्यालयाची मुकसंमती आहे असे बोलल्या जायचे. परंतु सततच्या कारवाईने मात्र तहसील कार्यालय कारवाई करू शकते हे दाखवून दिले आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.