वणी: वणीत पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध लोकांना लुटणारी टोळी सक्रीय झाली आहे. रविवारी दुपारी संजय पेचे यांची आई धनोजे कुणबी सामाजिक भवनात कार्यक्रमात जात असताना एका भामट्यानं त्यांच्या अंगावरील दागिणे लुटले. हा भामटा दुचाकीनं आला होता. त्यानं पोलीस असल्याची बतावणी केली होती.
गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद कॉलनीतील एका सेवानिवृत्त शिक्षकाला पोलीस असल्याची बतावणी करत फसवण्यात आलं होतं. ते वृध्ध साई मंदिर परिसरातून बँकेच्या लॉकरमध्ये दागिणे ठेवण्यासाठी घेऊन जात होते. तेव्हा त्यांच्याजवळील लाखो रुपयांची थैली हिसकावून भामट्यांनी पळ काढला.
या घटनेला आठवडा उलटत नाही तोच रविवारी पुन्हा एक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. तसंच पोलिसांनी अशा भामट्यांपासून सतर्क राहण्याचा इशारा दिलाय.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.