विवेक तोटेवार, वणी: वणी ठाण्यात 12 सप्टेंबर रोजी एक चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपीला तेव्हा अटक करण्यात आली होती. परंतु एक आरोपी मात्र पोलिसांना हुलकावणी देत होता. या अट्टल आरोपी व त्याच्या एका साथीदाराला वर्धा जिल्ह्यातील खरांगणा ता. आर्वी येथुन वणीच्या डीबी पथकाने अटक केली आहे.
12 सप्टेंबर रोजी वणी पोलीस ठाण्यात सुभाष येवले यांच्या तक्रारीवरून 397, 394, 324, 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु अनिल विनायक येमुलवार (22) रा. खडबडा मोहल्ला वणी हा गुन्हा दाखल केलेल्या तारखेनुसार फरार होता. हा आरोपी वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील पिंपळखुटा गावात असल्याची गोपनीय महिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली.
अजित जाधव यांनी त्वरीत डीबी प्रमुख सपोनि माधव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक वर्धा जिल्ह्यात पाठविले. पथकाने पिंपळखुटा पोलीस स्टेशन अंतर्गत खरांगना तालुका आर्वी जिल्हा वर्धा येथून आरोपीला अटक केली. विचारणा केली असता त्याचा साथीदार दिनेश रवींद्र मेश्राम (20) रा. खडबडा मोहल्ला वणी यालाही अटक करण्यात आली.
याच्यावर पोलीस स्टेशन वडगाव येथे कलम 379 नुसार गुन्हा नोंद आहे, शिरपूर पोलीस स्टेशन येथे कलम 379 नुसार गुन्हा नोंद आहे, मारेगाव पोलीस ठाण्यात कलम 379 नुसार गुन्हा दाखल आहे, पोलीस स्टेशन राळेगाव येथे कलम 379 नुसार गुन्हा नोंद आहे, व वणी पोलीस ठाण्यातही गुन्हा नोंद आहे. या दोन्ही आरोपीला 9 जानेवारी रोजी अटक करून गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यवतमाळ, पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे वणी, पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मदजव शिंदे, सुदर्शन वनोळे, वसीम शेख, विशाल गेडाम, पंकज उंबरकर यांनी केली.
Comments are closed.