अडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी….

बुद्धवंदना, ध्वजारोहण आणि झालेत विविध कार्यक्रम

0

सुशील ओझा, झरी: आज दिनांक 14 एप्रिल 2021 ला सकाळी 9 वाजता अडेगाव येथील आंबेडकर भवनमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शासनाची सर्व नियम पाळून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख एन. बी. देवतळे होते. त्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिक्षक धोंगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व बुद्ध वंदना घेण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात भूषण काटकर यांच्या गीतांनी झाली. संचालन दिलीप नगराळे, प्रास्ताविक छत्रपती काटकर, धोंगडे व देवतळे यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन प्रणय पाझरे यांनी केले. सर्व समाजबांधवांनी मास्क घालून कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू करमरकर, दिलीप करमरकर, तेजराज डांबारे, ज्ञानदेव कोल्हे, गंगाधर वनकर, भूषण काटकर, सिद्धार्थ वणकर, अंकुश मडावी, चेतन करमरकर, जयपाल नगराळे, किशोर काटकर,आशीष डंबारे, कुणाल करमरकर, मनोज चांदेकर,

प्रमेश येवले, बंडू पाटील, नामदेव वनकर, रामचंद्र वाघमारे, नेहल धोंगडे, शुभम जुमनाके, पुरुषोत्तम मून, दिनेश काटकर, बाळू पाटील, यश काटकर, मानव काटकर, खीलेश काटकर, साहील काटकर, रौनक डंबारे, तोशिबा नगराळे,आनंद वनकर,असंग डंबारे, प्रदीप नगराळे.आदींनी सहकार्य केले

हेदेखील वाचा

मोहदा येथील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

हेदेखील वाचा

गुलजार यांच्या गीतांनी रंगली मैफल सिंफनीची

Leave A Reply

Your email address will not be published.