कोरोना रुग्णाचा जीव वाचविण्याकरिता अडेगावच्या तरुणाची धडपड

पीपीई किट घालून रुग्णाला दाखल केले आदिलाबाद येथे

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून 6 किमी अंतरावर असलेल्या येडसी येथील एका कोरोना रुग्णाला श्वास घेण्याचा त्रास वाढला व त्याला ऑक्सिजन ची आवश्यकता होती. लॉकडाऊनमुळे त्यांच्या मदतीला कुणीही आले नाही. उपचारासाठी ऍम्बुलन्सही मिळाली नाही. आता मदत कोण करणार अशा विवंचनेत असताना त्यांच्या मदतीला अडेगाव येथील समाज सेवक मंगेश पाचभाई धावून आले.

Podar School 2025

मंगेश पाचभाई याला फोन करून रुग्णांच्या नातेवाईकांनी आपबिती सांगितली. रुग्णाला होणारा त्रास लक्षात घेऊन मंगेश त्वरित आपली चारचाकी घेऊन येडसी गावात पोहचला. रुग्णाची अवस्था पाहून व कोरोनाच्या रुग्ण असल्याने कुणीही मदत करण्याचा मनस्थिती नव्हते. आधीच यवतमाळ वणी, नागपूर व इतर ठिकाणी किरोनाची परिस्थिती गंभीर व कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजन नसल्याचे अधिक गंभीर असल्याने अखेर रुग्णाला आदीलाबाद घेऊन जाण्याचे ठरविले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आदीलाबाद कोण घेऊन जाणार हा प्रश्न उभा झाला. कुणीही रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाण्यास तयार नसल्याने अखेर मंगेशने पीपीई किट घालून स्वतःच्या चारचाकी मध्ये रुग्णाला टाकून गाडी चालवत घेऊन गेला व त्याला उपचारकरिता भरती केले. त्याच्या या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.