बेलोरा नदीपात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

0

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बेलोरा गावाजवळील वर्धा नदीपात्रात एका अनोळखी इसमाचे प्रेत मिळाले. आज दुपारी ही घटना 11 वाजता सदर घटना उघडकीस आली. मृतकाचे वय अंदाजे 50 वर्ष आहे. सदर इसमाच्या खिशामध्ये कोणतेही कागदपत्र किंवा चिठ्ठीआढळलेली नाही. शिवाय परिसरात तसेच नजीक असलेल्या घुग्गुस येथेही कुणी बेपत्ता असल्याची तक्रार नाही. त्यामुळे अद्याप मृतकाची ओळख पटलेली नाही.

दर इसमाचे प्रेत उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे. दरम्यान मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन शिरपूर पोलीस स्टेशनद्वारा करण्यात आले आहे. 

हे देखील वाचा:

अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर

दिलासादायक: तालुक्यातील 96 रुग्णांची कोरोनावर मात

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!