आधारकार्डसाठी सर्वसामान्यांची झुंबड

एकच सेंटर असल्याने नागरिकांची गैरसोय

0
विवेक तोटेवार, वणी: आधार कार्ड आवश्यक असल्याने सध्या आधार कार्ड काढण्याकरिता रांगा लागल्या आहेत. वणीच्या नगर परिषदेद्वारा आधार कार्ड सेंटरसाठी जागा देण्यात आली आहे. परंतु संपूर्ण वणीत एकाच सेंटर असल्याने जनतेची चांगलीच दमछाक होत आहे. सकाळी 6 वाजतापासून काही जण रांगेत लागत आहे. सरकारी कर्मचारी तर एक दिवसाची सुट्टी घेऊन आधार कार्डसाठी रांगेत लागत आहे. सरकारने लवकरच तीन ते चार सेंटर सुरू करावी अशी जोर धरत आहे.
 वणीत सरकारद्वारे दोन ठिकाणी आधार सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये एक तहसील कार्यालयाजवळ व एक नगर परिषदेत होते. त्यातील एक तहसील कार्यालायजवळील सेंटर बंद झाले. त्यामळे आता एकच सेंटर सुरू आहे. वणी शहरात एकाच सेंटर असल्याने आधार कार्ड काढणाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. सकाळी 6 वाजतापासून काही जण रांगेत उभे आहेत. त्यातच दिवसभरात फक्त 40 जणांचे आधार कार्ड निघत आहे.

 त्यापैकी 20 महिला व 20 पुरुष जर या काळात लिंक फेल झाल्यास याही पेक्षा कमी जणांचे आधार कार्ड निघते. त्यामुळे आता तीन ते चार सेंटर सुरू करण्याची मागणी वणीकर करीत आहेत. काही जण तर दिवसभर येथे थांबण्यापेक्षा शिरपूर, मार्डी, मारेगाव या ठिकाणी जाऊन आधार कार्ड काढत आहे. यावरून जनतेची किती गैरसोय होत आहे हे दिसून येते.

त्यातच महत्वाचे म्हणजे या ठिकाणी जी फी आकारल्या जाते त्याबाबत कोणतेही फलक लावलेले नाही. सर्वांकडून 50 रुपये घेतल्या जात आहे. ज्याचे आधार कार्ड आले नाही. कुणाचे आधार कार्डमध्ये त्रुटी असल्यास त्याच्याकडूनही 50 रु घेतल्या जात असल्याने या ठिकाणी सर्वसामान्यांची लूट होत आहे. परंतु या अन्यायाला कुणीही वाचा फोडत नाही आहे. एकही राजकीय नेत्याने या ठिकाणी येऊन भेट दिली नाही. यावरून कुणीही जनतेची समस्या समजून घेत आहे हे दिसून येत आहे. हे सर्व आता थांबवयास पाहिजे अशी मागणी काही सुजाण नागरिकांकडून होत आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.