विवेक तोटेवार, वणी: पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा विविध उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोणताही बडेजाव न आणता अत्यंत साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे वणीत सामाजिक उपक्रम घेऊन आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. युवासेनेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सकाळी शिवसैनिकांनी मोकळ्या जागेवर वृक्षारोपण केले. त्यानंतर वणीतील ग्रामीण रुग्णालयता आरसेनिक अल्बम या रोग प्रतिकारक शक्ती वाढवणा-या होमियोपॅथिक औषधीचे रुग्णांना वाटप करण्यात आले. यावेळी जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, नर्स व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर वणीतील पोलीस ठाण्यातही आरसेनिक अल्बम या औषधीचे वाटप करून पोलीस कर्मचा-यांना मास्कचे वाटप करण्यात आले.
एक दिवस मोफत शिवभोजन
आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसामुळे वणीतील शिवभोजन थाळी आज दिवसभरासाठी मोफत ठेवण्यात आली होती. याशिवाय ठिकठिकाणी मास्कचेही वाटप करण्यात आले. हे सर्व कार्यक्रम शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांच्या पुढाकारातून घेण्यात आला.
यावेळी शरद ठाकरे, सतीश वारते, कुंदन टोणगे, बंटी येरने, महेश चौधरी, अजय चन्ने, प्रशांत बलकी, शुभम मदन, नरेंद्र ताजने, अनुप चटप, ललित जूनेजा, सौरभ खडसे, नीलेश कराडबुजे, बोरुले वकील, प्रशांत दुबे, कुणाल लोणारे यांच्यासह शिवसेना, युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.