अफलातूनचा बाल उत्सव साजरा

0

देवेंद्र खरबडे (सांस्कृतिक प्रतिनिधी) वणी:- येथील ग्रामीण समस्यामुक्ती ट्रस्ट व पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे अफलातून बाल उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे प्रशासन अधिकारी गिरीधर चवरे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रेस वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गजानन कासावर, केंद्रप्रमुख लक्ष्मण इद्दे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक प्रकाश चहाणकर यांनी केले.

अनीस हॉलमध्ये मेलजोल संस्था मुंबई यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या अफलातून उपक्रमाअंतर्गत वणी तालुक्यातील 98 जिल्हा परिषदेच्या शाळा, 11 नगर परिषद शाळा व 15 खाजगी शाळा अशा एकूण 125  शाळांचे 9091 विद्यार्थी यात सहभागी आहेत. या उपक्रमांतर्गत मुलांना त्यांचे हक्क, जबाबदारी तसेच विद्यार्थ्यांचे होत असलेले शोषण या विषयी जागृत करण्यात येते.

या आनंदमेळाव्यात गणेशपूर, पळसोनी, राजूर(ई.), शिवणी, शिंदोला, वागदरा या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, नृत्य, शो ड्रिल सादर केले. मुर्धोनी, दहेगाव, नायगाव(बु.), वांजरी, स्वा. सावरकर नगर परिषद शाळा क्र. 5 च्या मुलांनी आपापले मनोगत व्यक्त केले.अतिथींसोबत महादेव धगडी, संजय चचाने, राजश्री मल्लूरवार, माणिक परसावर, कुंदा कुंभलवार यांनी प्रसंगानुरूप मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे संचालन माधुरी कोटेवार यांनी केले. आभार प्रदर्शन नीलेश गाडगे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी उत्तम लडके, जया भोयर, प्रिया देवतळे, यांनी परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.