मद्यधुंद अवस्थेत दोघांचा चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयात धिंगाणा

0

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन मद्यधुंद अवस्थेत जाऊन कर्मचा-यांना मारहाण व शिविगाळ केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. संध्याकाळी चारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

फिर्यादी गजानन नामदेवराव चोपडे हे चिखलगाव ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते नेहमी प्रमाणे ऑफिसमध्ये काम करीत होते. यांच्यासोबत गटविकास अधिकार धनपाल पोसे, पंचायत समिती वणीचे जाधव, खैरे, ग्रामविकास अधिकारी नागरगोजे, चिखलगावचे सरपंच अनिल पेंदोर, उपसरपंच अमोल रांगणकर, हे सर्व उपस्थित होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास सोमेश्वर थेरे (30) राहणार चिखलगाव व मारोती कवडू पोतराजे (35) राहणार चिखलगाव दोघेही मद्यप्राशण करून कार्यालयात आले. त्या दोघांनी आमच्या घरासमोरून सिमेंट रोड तयार करून द्या अशी मागणी केली. त्यावर चोपडे यांनी लेखी अर्ज द्या असे म्हटले. यावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला व त्यांना अश्लिल शिविगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर आरोपी थेरे यांनी कार्यालयातील गोंधळ घालत कार्यालयातील खुर्ची उचलून आदळआपट करायला सुरूवात केली. तसेच कर्मचा-यांना मारण्यासाठी बाहेर धावत जाऊन दगड आणला. मात्र सरपंचानी त्यांच्या हातातील दगड हिसकावला. मद्यधुंद अवस्थेत त्या दोघांनी कार्यालयातील सर्व फाईल फेकल्या व पाणी पुरवठा कर्मचारी आशिष कातकडे याला मारहाण व अश्लिल शिविगाळ केली.

या प्रकरणी आरोपींवर सरकारी काामात अडथडा आणल्याबाबत कलम 353, 294, 504, 34 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना वणी पोलिसांनी रात्री 11 च्या सुमारास अटक केली. घटनेचा पुढील तपास पोलीस उप निरिक्षक अशोक काकडे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.