सराटी येथील शेतकरी वसंत झाडे यांनी केला शेतीमधला आधुनिक प्रयोग

संजय देरकर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केले नव्या प्रयोगाचे कौतुक

0

जोतिबा पोटे,मारेगाव: पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार, निकृष्ट चाकरी ही म्हण खूप प्रचलित होती. हिचा अर्थ शेती करणे हे सर्वाेत्तम कार्य आहे, व्यापार हे मध्यम कार्य आहे, नोकरी हे निकृष्ट दर्जाचे काम आहे, तर भीख मागणे हे सर्वात वाईट काम आहे. वर्षानुवर्ष चालत आलेली धारणा मात्र आता पूर्णपणे बदलली आहे. मारेगाव तालुक्यातील सराटी येथील शेतकरी वसंत झाडे यांनी केलेला शेतीमधला आधुनिक प्रयोग हा नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या कार्याची दखल स्वत: शेतकरी असलेले संजय देरकर यांनी प्रत्यक्ष झाडे यांच्या शेतात जाऊन त्यांचं कौतुक केलं.

व्यापार आजही मध्यम दर्जाचे कार्य आहे, मात्र नोकरीला सर्वाेत्तम दर्जा प्राप्त झाला असून, शेती करण्याला निकृष्ट दर्जा दिला जात आहे. कोणत्याही व्यापाराचा किंवा शेतकऱ्याचा मुलगा असला तरी त्या सर्वांचे स्वप्न हे आता नोकरी करणे हेच आहे. शेतीपासून लोक दूर जात आहेत. या व्यवसायासकडे पाठ फिरवत आहेत. मात्र शेती आपली संस्कृती आहे. तिच्यातून समृद्धीकडे वाटचाल करावी, वेगाव येथे शेती करणारे आणि शेतीत विशेष रुची ठेवणारे संजय देरकर ‘वणी बहुगुणी’शी बोलताना म्हणाले.

भारतामध्ये जे दरडोई उत्पन्न आहे तेसुद्धा शेतीमुळे आहे. यामुळेच की काय भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जाते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता शेतीची उत्पादकता आणि उत्पादन वाढ करणे ही काळाची गरज आहे. शेतीसाठी विविध प्रकारची संशोधने आज होत आहेत व ही संशोधने सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तरच शेतीचा विकास होणे शक्य आहे.

आधुनिक अवजारांचा अवलंब शेतीमध्ये होण्याबरोबरच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे वाण, नवीन कृषी पद्धती या सर्व गोष्टी ग्रामीण भागात पोहचली पाहिजे. तसेच शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा, यासाठी कृषितज्ज्ञांकडून हिरवळीच्या खतांचे मार्गदर्शन वारंवार घ्यावं. शेतामध्ये दिवसरात्र परिश्रम करणा-या शेतक-यास नवनवीन शेतकी अवजारांची माहिती व्हावी, यासाठी आधुनिक शेतकी अवजारांचे प्रात्यक्षिक सर्व शेतकऱ्यांनी पाहावेत. शेतीबरोबरच दुभती जनावरे शेतकरी पाळतो. गाई, म्हैस अशा प्रकारची दुभती जनावरे यांचे संगोपन शेतकरी करत असतात. यासाठी अशा जनावरांचे संगोपन कशाप्रकारे करावे, याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचं संजय देरकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.