उपसरपंच्यावर कार्यवाहीसाठी रविवारपासून उपोषण

रेतीचोरी प्रकरणाची चौकशी न झाल्याने सरपंचाचा इशारा...

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण ग्रामपंचयातमध्ये निवडणूक झाल्यापासून सरपंच व उपसरपंच यांच्यात तक्रारी व चौकशी करण्याची शर्यत लागलेली पहायला मिळत आहे. सरपंच रमेश हललवार व उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांच्यात तक्रारीचे युद्ध सुरू असून दोघांनीही एकमेकांना पदावरून पायउतार केले सदस्य अपात्र केले आहेत. तर अनेक प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. ज्यामुळे पाटण गावाचे विकास कामे थांबले असून एकमेकांचे पाय ओढण्यातच दिवस चालले आहे. रेती चोरी प्रकरणी व शासकीय इमारतीचे विल्हेवाट लावल्यावरून कार्यवाहीची मागणी केली होती. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने आता सरपंच उद्यापासून उपोषणाला बसणार आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ दरम्यान मंडळ अधिकारी चांदेकर व निवडणूक सुरक्षा पथक यांनी दिग्रस रेल्वे गेटजवळ उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांच्या मालकीच्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच २९ एके २३९७ अवैधरित्या रेती वाहतूक करीत असताना पकडला. मंडळ अधिकारी चांदेकर पंचनामा करीत असताना मोक्यावर ट्रॅक्टर मालक प्रवीण नोमुलवार आले व मंडळ अधिकारी यांच्याशी वाद करून जोर जबरजस्टीने रेतीने भरलेला ट्रेक्टर घेऊन गेले. त्यावेळेस सरपंच हललवार हे पहाटे मॉर्निंग वॉकिंग करिता गेले होते. हा प्रकार त्यांच्या समक्ष घडला. घडलेल्या घटनेचा पंचनामा मंडळ अधीकारी चांदेकर व देशपांडे यांनी तयार केला.

घडलेल्या घटनेचची शुटिंग करून तहसीलदार यांच्या कडे कार्यवाही करिता पाठविले. तसेच पाटण येथील दर्ग्याजवळ अविद्य रेतीसाठा जमा केल्याबाबत तहसील कार्यालयातून नोटीस देण्यात आली. परंतु उपसरपंच नोमुलवार यांनी कोणताही दंड भरला नाही व आजपर्यंत नोमुलवार यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही ज्यामुळे सरपंच व ग्रामवासीयांनी २७ जुलै ला कार्यवाही करिता तक्रार देण्यात आली होती. परंतु अजूनही नोमुलवार यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच उपसरपंच नोमुलवार यांनी सरपंच हललवार यांच्या विरुद्ध सण २०१७ मध्ये अविश्वस प्रस्ताव आणून प्रभारी सरपंच असतांना तत्कालीन सचिव याना हाताशी धरून ग्रामपंचयातच्या मालकीची ३० ते ४० वर्षांपूर्वीची इमारत ज्यामध्ये गावातील तरुण युवक व गावातील लोकांसाठी व्यायाम करण्याकरिता व्यायामाचे साहित्य होते.

गावातील तरुण युवक व्यायाम करीत होते ते लाखो रुपयांची इमारत अविनाश जयस्वाल याला कुणालाही न विचारता किंवा वरीष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर आर्थिक उलाढाल करून अविनाश जयस्वाल यांच्या ताब्यात दिले. याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी झाली व त्यात उपसरपंच प्रवीण नोमुलवार व तत्कालीन सचिव दोषी असल्याबाबत चौकशी अहवाल पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद यवतमाळ कडे पाठविण्यात आले. परंतु अजूनपर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली नाही.

तरी उपसरपंच नोमुलवार यांच्याविरुद्ध अवैध रेती चोरी व शासकीय इमारतीचे परस्पर विल्हेवाट लावल्याबाबत त्यांच्यावर कार्यवाही करून गुन्हे दाखल करावे. अन्यथा १ सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याची तक्रार सरपंच रमेश हललवार यांनी तहसीलदार सह वरिष्ठ अधिकारी यांना तक्रार दिली. मात्र त्यावर कोणताही कार्यवाही न झाल्याने ते उद्यापासून उपोषणावर बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.