बेपत्ता शिक्षकाची पाटाळ्याच्या पुलाजवळ दुचाकी आढळल्याने खळबळ

जितेंद्र कोठारी, वणी: जैन ले आऊट येथील रहिवासी असलेले शिक्षक अजय विधाते हे गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यांची दुचाकी पाटाळ्याच्या पुलावर आढळल्याने त्यांचे कुटुंबीय चिंतेत आले आहे. गुरुवारी त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची पथक बोलावण्यात आले आहे. हे पथक सध्या वर्धा नदीच्या पात्रात त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान त्यांच्याबाबत काही माहिती असल्यास तात्काळ याची माहिती द्यावी असे आवाहन सोशल मीडियातून त्यांच्या कुटुंबीयांनी व मित्रपरिवाराने केले आहे.

सविस्तर वृत्त असे की अजय लटारी विधाते (39) हे जैन ले आऊट येथील रहिवासी आहे. ते कोरपना तालुक्यातील कोळसी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे. बुधवारी दिनांक 19 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास ते बाहेर फेरफटका मारून येतो असे सांगून दुचाकीने घराबाहेर पडले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी अजय बद्दल त्यांचे मित्रमंडळी तसेच नातेवाईकांकडे विचारणा केली. मात्र त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.

दुस-या दिवशी म्हणजे गुरुवारी त्यांच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दाखल केली. दरम्यान पाटाळ्याच्या पुलावर अजय यांची दुचाकी आढळून आली. त्यामुळे एडीआरएफचे पथक तात्काळ बोलावण्यात आले. हे पथक नदीच्या पात्रात त्यांचा शोध घेत आहेत. मात्र दिवसभरात त्यांचा कुठेही शोध लागला नाही.

सोशल मीडियातून आवाहन
अजय हे बेपत्ता झाल्यावर गुरुवारपासून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान ते बेपत्ता झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. मात्र सोशल मीडियातूनही त्यांच्याबाबत कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. त्यांची दुचाकी पाटाळाच्या पुलावर आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

हे देखील वाचा: 

कोलगाव ते आबई फाट्या पर्यंत रात्रीपासून ट्राफिक जाम

मुकुटबन येथील बीएस इस्पातचा कोळसा घोटाळा पोहोचला विधानसभेत

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.