विविध सामाजिक उपक्रम राबवून अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस साजरा

रुग्ण व वृद्धांना फळ तर गरजूंना ब्लँकेटचे वाटप

विवेक तोटेवार, वणी: युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. अनाथ आश्रम, बालसदन, ग्रामीण रुग्णालय व वृद्धाश्रमात फळ, ब्लॅंकेट व चादर वाटप असे विविध उपक्रम या दिवशी राबवण्यात आले.

मंगळवार 22 नोव्हेंबर रोजी अजिंक्य शेंडे यांचा वाढदिवस होता. गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच तत्पर राहतात. आपल्या याच व्यक्तिमत्वाचा परिचय देत त्यांनी आपला वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला. त्यांनी या दिवशी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ, ब्लॅंकेट, व चादर वाटप केल्या, त्यानंतर बालसदन येथे अनाथांना ब्लँकेट व फळ वाटप केले तर आयटीआय जवळील अपंग शाळेतील विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट व फळ वाटप केले.

वणीतील पळसोनी रोडवरील वृद्धाश्रमाला भेट दिली व त्यांनाही धान्य व फळ वाटप केले. या कार्यात युवासेनेचे पदाधिकारी तसेच अजिंक्यचा मित्रपरिवार दिपणकार वनकर, विक्रम कुलकर्णी, कपिल कुंतलवार, सागर मेश्राम, प्रवीण मांडवकर, अंकित मडावी, गणेश पेटकर, किशोर ठाकरे, प्रफुल बोर्डे, चेतन उलमाले, अंकेश्वर बोंडे, कृष्णा सीडाम, आदित्य सातपुते, दिनेश बोंडे, अनिकेत बदकल, लोकेश मेश्राम यांनी सहकार्य केले.

हे देखील वाचा: 

ब्रेकिंग न्युज – ब्राह्मणी गावालगत आज पहाटे वाघाचा धुमाकूळ

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.