निंबादेवी ग्रामपंचायतीच्या विकास कामात घोटाळा झाल्याचा आरोप

उपसरपंच अशोक शर्लावार यांची मुख्यकार्यकारी अधिकारीकडे तक्रार

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अतीदुर्गम भागात असलेल्या निंबादेवी ग्रामपंचायतच्या कामात लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप उपसरपंचाद्वारे करण्यात आला आहे. कामे न करताच तत्कालिन सचिवांनी निधीची उचल केल्याचा उपसरपंचांचा आरोप आहे. याबाबत उपसरपंच अशोक शर्लावार यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ येथे तक्रार केली असून या कामाच्या चौकशीची मागणी केली आहे. याआधी या प्रकरणाची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यावरून सचिवांचा प्रभार काढण्यात आला असून त्या जागी दुस-या व्यक्तीकडे प्रभार देण्यात आला आहे.

निंबादेवी ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. तालुक्यात 2021 मध्ये ग्रामपंचायतच्या निवडणूका झाल्या. निवडणुकीत निंबादेवी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी अशोक शर्लावार यांची निवड झाली. परंतु कोरोना संसर्ग असल्यामुळे ग्रामपंचायतचे सर्व कामे ऑनलाइन सुरू होते. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य सर्वांनी ग्रामसेवक यांच्याकडून मागील जमा खर्चाची माहिती घेतली असता यातील अनेक व्यवहार संशयास्पद आढळून आलेत.

तक्रारीनुसार, सन 2015 ते 2021 जून पर्यन्त 14 व्या वित्त आयोग निधीतील 19 लाख 51 हजार रुपये व पेसा निधीतील 17 लाख 55 हजार असे एकूण 37 लाख रुपयाचा निधी कागदोपत्री रेकॉर्डवर दाखवून उचल करण्यात आल्याचे उपसरपंचांच्या निदर्शनात आले. मात्र या विकासकामाची चौकशी ग्रामपंचायतच्या बॉडीने केली असता गावात एकही विकासकामे करण्यात आले नसल्याचे आढळून आल्याचा आरोप उपसरपंचांनी केला आहे.

यावरून उपसरपंच शर्लावार यांनी विकासकामांच्या नावाने तत्कालिन सचिव शेडमाके यांनी केलेल्या 37 लाखांच्या कामांची चौकशीची मागणी केली आहे. ग्रामपंचायत सचिवांची तक्रार होताच गटविकास अधिकारी गजानन मुंडकर यांनी 1 जुलै रोज सचिव बी एस शेडमाके यांचा प्रभार काढला व त्या ठिकाणी प्रकाश बळीद यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. नवीन प्रभार आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे.

हे देखील वाचा:

चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक शिरला चक्क हॉटेलमध्ये

प्रा. आ. केंद्र मार्डी येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.