ठराविक वेळेत बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी द्या
मारेगावतील व्यापा-यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे, निवेदन सादर
नागेश रायपुरे, मारेगाव: गेल्या एक वर्षाांपासून लॉकडाऊनमुळे लहान-मोठया सर्वच व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. यात अनेक व्यापा-यांचे कर्जाचे हप्ते, दुकान भाडे, टेक्स, इलेक्टिक बिल, कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहे. नुकताच लॉकडाऊन जाहीर केल्याने आता नक्कीच व्यापारी वर्गावर उपास मारीची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा आदेश मागे घ्या किंवा ठराविक वेळेत दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या अशी मागणी निवेदन चेंबर ऑफ कॉमर्स व्यापारी असोसिएशन मारेगावच्या वतीने करण्यात आली. आज मंगळवार दिनांक 6 एप्रिल रोजी याविषयी तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी लादलेल्या लॉकडाऊन मध्ये सर्वच लहान मोठ्या व्यापारी वर्गानी आर्थिक फटका सहन करत आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केले व “कोविड 19” च्या नियमांचे पालन केले. त्यामुळे व्यापारी वर्ग आधीच आर्थिक अडचणीचा सामना करत असताना, नुकताच कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव राज्यात झपाट्याने वाढत असल्याने,नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 5 ते 30 एप्रिल परंत “ब्रेक द चेन” या दुस-या लॉकडाऊनचा आदेश जाहीर केला.
सदर लॉकडाऊन मागे घ्यावा किंवा ठराविक वेळा बाजारपेठ सुरू करण्यासाठी द्यावा अशी मागणी करण्यात आली. निवेदन देते वेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संदीप खुराणा, उपाध्यक्ष नाशिकेत मत्ते, सचिव दुष्यंत जयस्वाल यांच्यासह व्यापारी असोसिएशनचे सद्स्य उपस्थित होते.
हे देखील वाचा: