आनंदाची बातमी: खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ

कापसाच्या भावात 275 रुपयांची वाढ...

0

जितेंद्र कोठारी, वणी: केंद्र शासनाने सोमवारी खरीप हंगाम 2020 -21 साठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत दीडपट वाढ केली आहे. त्यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही आता किमान 260 रुपये प्रति क्विंटल मागे जास्त मिळणार आहे.

मोदी सरकारच्या आर्थिक व्यवहार संसदीय समितीच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. बैठकीत मध्यम स्टेपलच्या कापसाची किमान आधारभूत किंमत 260 रुपयांनी वाढ होऊन 5515 रुपये प्रति क्विंटल तर लांब स्टेपलचा कापूस 275 रुपयांनी वाढ करून 5825 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आली आहे.

इतर पिकांसाठी 53-755 रुपयांची वाढ
धान, बाजरी, मक्का, तूर, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, तिळ, नायजर सीड या खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत 53 ते 755 रुपये दर क्विंटल मागे भाव वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विदर्भातील कापूस व सोयाबीन उत्पादक लाखों शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Ankush mobile

अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्जे घेतली आहेत. त्यांची परतफेड करण्यासाठी त्यांना कालावधी वाढवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना ऑगस्टपर्यंत कर्जाची परतफेड करता येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री यांनी दिली.

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!