अंगणवाडी सेविकांना मोबाईलवर माहिती भरणे बनले डोकेदुखी

प्रकल्प अधिका-यांचे निवेदन घेण्यास नकार

0

भास्कर राऊत, मारेगाव: अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीत चालना-या विविध उपक्रमाची माहिती दररोज मोबाईलवर ऑनलाईन भरावी लागते. त्यासाठी सेविकांना एकात्मिक प्रकल्पा कडून मोबाइल देण्यात आला. परंतू हे मोबाईल निकृष्ठ दर्जाचे असल्याने गरम होतात व हँग होता. तसेच इंग्रजीमध्ये काम करणे कठीण जात आहे . त्यामुळे या कामातून मुक्त करा अशा आशयाचे निवेदन कुंभा बीटतील अंगणवाडी सेविकांनी प्रकल्प अधिका-याना देण्याचा प्रयत्न केला. परंतू पकल्प अधिका-यानी निवेदन घेण्यास नकार दिला.

अंगणवाडीमध्ये चालना-या विविध उपक्रमाची डिजिटल माहिती मोबाइल द्वारे भरणे बंधनकारक केले आहे.त्यासाठी या अंगणवाडी सेविकांना प्रकल्प कार्यालया कडून मोबाइल पुरविण्यात आले. परंतू हे मोबाइल निकृष्ठ दर्जाचे असल्याने यात अनेक गोष्टी लोड होत नाही. तसेच इंग्रजीमध्ये सर्व काम असल्याने या सेविकांना काम करताना अडचणी जात आहे.

त्यामुळे या कामातून मुक्त करा या मागणीचे निवेदन देण्यासाठी कुंभा बीट मधील अंगणवाडी सेविका मंगळवार ला प्रकल्प कार्यालयात आल्या होत्या. परंतू प्रभारी प्रकल्प अधिकारी जया मोरे यांनी हे निवेदन घेण्यास नकार दिल्याने अंगणवाडी सेविका खाली हात परत गेल्या.

 एखाद्या गोष्टींची संविधानिक मार्गाने मागणी करणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्यावर कार्यवाही होणे किंवा न होणे ही प्रशासकीय बाब आहे. अधिकारीही आपल्या मागण्यांसाठी वरिष्ठांकडे निवेदन सादर करीत असतात. त्यामुळे अधिका-यांनी किमान निवेदन स्वीकारणे गरजेचे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

हे देखील वाचा:

फॅशन व इंटेरिअर डिझायनिंगसाठी मोफत डेमो क्लासेस

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.