आरोपी अनिल मेश्रामला एकदिवसाची पोलीस कोठडी

0

विलास ताजने, वणी : मारेगाव पोलिसांवर हल्ला करून आरोपी अनिल मेश्राम २६ नोव्हेंबर पासून  फरार होता. पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ हिवरीचे जंगल पिंजून काढले होते. मात्र आरोपी हाती लागत नव्हता. दरम्यान आरोपी घरी ये-जा करू लागल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. 


पोलीस आरोपीवर पाळत ठेवून होते. अशातच आरोपी पांढरकवडा परिसरात असल्याचा सुगावा मारेगाव पोलिसांना लागला. मारेगाव पोलिसांच्या गोपनीय माहितीच्या आधारे १६ डिसेंबरला रात्री आरोपीला पांढरकवडा पोलिसांनी लगतच्या हिवरा बारसा गावातुन अटक केली. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला मारेगाव पोलिसांच्या सुपूर्द केले.


आज दि. १७ सोमवारी आरोपी अनिलला वणी न्यायालयात हजर केले. मारेगाव पोलिसांनी आरोपीच्या चौकशी करिता पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सध्या आरोपी मारेगाव पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.