सॅनिटायझर प्यायल्याने वणीत आणखी एकाचा मृत्यू

एका आठवड्यात 7 जणांनी गमावला जीव

0

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउनच्या काळात दारू मिळत नसल्यामुळे सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेची शाई वाळत नसतानाच मंगळवारी आणखी एका व्यक्तीनी सॅनिटायझर पिऊन प्राण गमावले आहे. अनिल चपंतराव गोलाईत (49) रा. माळीपूरा वणी असे मृतकाचे नाव आहे. याबाबत फिर्यादी राजू चपंतराव गोलाईत यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मृतक अनिल हा मोलमजुरी करीत होता. त्याला दारु पिण्याची सवयी होती. मात्र लॉकडाउन असल्यामुळे दारु मिळत नसल्याने त्याला अस्वस्थ वाटत होते. दारु मिळण्याकरीता त्याने अनेक प्रयत्न केले. मात्र त्याला दारु मिळाली नाही.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मंगळवार 27 एप्रिलला सकाळी 8.30 वाजता दरम्यान अनिलची तब्येत अचानक बिघडली. तेव्हा त्याचा भाऊ राजू यांनी त्याला काय झालं अशी विचारणा केली असता त्यांनी सॅनिटायझर प्यायल्याचे सांगितले. राजू गोलाईत यांनी तात्काळ अनिलला वणी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दवाखान्याच्या डेथ मेमोवरून वणी पोलिसांनी कलम 174 जाफौ अनव्ये गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास ए एस आय जगदीश बोरनारे करीत आहे. 

हे देखील वाचा:

अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर

Leave A Reply

Your email address will not be published.