जितेंद्र कोठारी, वणी: अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला पळवून नेऊन लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीच्या मुकुटबन पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. विलास तुकाराम आत्राम (27) रा. झरी तालुका असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. पीडित मुलीच्या आईने नोंदविलेल्या तक्रार व मुलीने दिलेल्या बयानावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 363, 366 (अ), 376 व पॉक्सो अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार विलास आत्राम यांने ओळखीतील एका 16 वर्षाच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिचे लैंगिक शोषण केले. दम्यान आरोपीने मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत शुक्रवारी 3 डिसेंम्बर रोजी मुलीच्या आईने मुकुटबन पोलीस ठाण्यात आरोपी विलास यांनी मुलीला फूस लावून पळवुन नेल्याची तक्रार दाखल केली होती.
तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तात्काळ शोध मोहीम सुरू केली. दरम्यान आरोपी हा वणी तालुक्यातील रासा गावात नातेवाईकाच्या घरी लपून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोलीस पथकानी रात्रीच रासा येथून आरोपी विलास आत्राम आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.
महिला पोलीस अधिकारी सपोनि संगीता हेलोंडे यांच्या समोर पीडित मुलीचे बयान नोंदविले. आरोपी यांनी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन बळजबरीने अत्याचार केल्याचे बयान पीडित मुलीने दिले. पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 363, 366 (अ), 376 व पॉक्सो अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी विलास आत्राम यास शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
हे देखील वाचा:
Comments are closed.