अवैधरित्या दुचाकीने दारूची तस्करी करणारा अटकेत

देशी दारुच्या सुमारे 250 बॉटल जप्त

0

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून अवैध देशी दारू दुचाकीने घेऊन जाणाऱ्या युवकास पोलिसांनी पकडून कार्यवाही केली. 21 मे रोजी सकाळी साडे 9 वाजताच्या सुमारास मुकुटबन येथील राहुल दुर्गे (25) हा देशी दारूच्या 240 बॉटल घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली यावरून बिट जमादार रंजना सोयाम व स्मिता आडे या दोघींनी येडसी रोडने पाठलाग करून करून राहुल दुर्गे याला पकडले.

राहुलची तपासणी केली असता त्याच्याजवळ असलेल्या पांढऱ्या कलरच्या प्लास्टिकच्या थैलीत प्लॅस्टिकच्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. दुचाकी सह दारूच्या बाटल्या ठाण्यात आणल्या. दुचाकी क्र एम.एच 29,ए आर 3121 किंमत 15 हजार व देशी दारूच्या 240 बॉटल 14 हजार 400 असे एकूण 29 हजार 400 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राहुल दुर्गे याच्या विरुद्ध कलम 65 ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ए.एस. आय ऋषी ठाकूर करीत आहे.

इतर ठिकाणी करवाई का नाही?
तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत मुकुटबन, गणेशपूर, तेजापूर, बोपापूर, डोंगरगाव, अडेगाव व इतर ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे एकावर कारवाई तर दुस-यांना अभय का दिला जात आहे असा सवाल आता उपस्थित होत आहे. यात काही हित संबंध तर गुंतलेले नाही हे देखील तपासण्याची गरज आहे.

हे देखील वाचा:

आज तालुक्यात अवघे 26 पॉझिटिव्ह, शेलू (खु) येथे 9 रुग्ण

शिक्षकांनी वर्गणी गोळा करून दिले 3 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

Leave A Reply

Your email address will not be published.