जितेंद्र कोठारी, वणी: आज सकाळी विशेष पोलीस पथकाने देशी दारुची अवैधरित्या तस्करी करणा-याच्या मुसक्या आवळल्या आहे. सकाळी 9 वाजता ब्राह्मणी फाट्यावर ही कारवाई करण्यात आली. रवि महादेव दुपारे रा पंचशील नगर वणी असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 300 देशी दारूच्या पव्व्यासह मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे.
सोमवारी दिनांक 21 जून रोजी सकाळच्या सुमारास विशेष पोलीस पथकाला ब्राह्मणी फाटा येथून चंद्रपूर जिल्ह्यात देशी दारुची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथक सकाळी 9 वाजताच्या सुमारास ब्राह्मणी फाट्यावर गेले असता तिथे एका मोटारसायकलवरून एक व्यक्ती देशी दारुचे पव्वे नेत असताना आढळला.
मोटारसायकल स्वाराचे नाव रवि महादेव दुपारे असून तो पंचशील नगर येथील रहिवाशी आहे. त्याच्याकडे देशी दारुचे 300 पव्वे आढळून आले. पोलिसांनी अवैध देशी दारूचा साठआ व मोटारसायकल असा एकूण 61,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरण पो स्टे. वणी यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
हा कारवाई डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सा. पोलीस अधीक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि मुकुंद एस. कवाडे वणी व पांढरकवडा उपविभाग, पीएसआय आशिष झिमटे, राजू बागेश्वर, जितेश पानघाटे, मुकेश कारपते, मिथुन राऊत, नीलेश भुसे, अजय वाभीटकर व अजय महाजन यांनी केली.
हे देखील वाचा: