तहसीलदार व तालुका वैद्यकीय अधिकारी जनजागृतीकरिता रस्त्यावर

पोडावरच्या घरी जाऊन लोकांचे लसीकरण

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यात ‘माझे लसीकरण, माझे संरक्षण…’ या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानांतर्ग याच अनुषंगाने तहसीलदार गिरीश जोशी नायब तहसीलदार रामगुंडे तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम हे जनतेच्या हिताकरिता रस्त्यावर उतरले. लसीबाबत नकारात्मक विचार करीत असलेल्या गावात जाऊन घरोघरी लसीबाबत माहिती देत लस घेण्याकरिता जागृत करीत आहे, तर लस घेणाऱ्या लोकांना घरीच लस देण्याचे काम करीत आहे. तसेच लसीबाबत कोणतीही भीती न बाळगता लसीकरणच हाच एक कोरोनापासून बचाव करण्याचा उपाय असल्याने प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे असे आवाहन तहसीलदार गिरीष जोशी, रामगुंडे आणि डॉ. मोहन गेडाम यांनी केले आहे.

अनेक लोकांच्या मनातील शंका दूर करण्यात तहसीलदार जोशी नायब तहसिलदार रामगुंडे व तालुका वैद्यकीय अधिकारी गेडाम यांना यश येत आहे. महसूल व महसुलची टीम जामनी व झमकोला गावातील प्रत्येक घरात जाऊन जनजागृती करत असून इतरही गावात जाऊन जनजागृती करून 100 टक्के गावातील जनतेला लसीकरण करण्यास तयार करणार असल्याचे आमचे प्रयत्न राहील असे तिनही अधिकारी यांचा मानस असल्याचे सांगितले. सदर मोहिमेत वरील अधिकारी यांच्या सह नर्स, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका सहभागी आहे.

कोविड 19 या आजारापासून सुरक्षित राहण्याकरिता व आजारापासून बचाव करिता सर्व जनतेनी लस घेणे आवश्यक आहे. याकरिता जिल्हा प्रशासन सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील ग्रामीन भागातील ज्या लोकांनी कोविडची लस घेतली नाही अश्या सर्व जनतेला लस घेण्याकरिता आवाहन करण्यात आले आहे. तर जिल्हाधिकारी यांनी ‘माझे लसीकरण सर्वांचे संरक्षण, सर्वांचे लसीकरण, माझे संरक्षण’ योजने अंतर्गत ग्रामीण भागातील पात्र लोकांना लसीकरण करीता जागृत करून लस घेण्यास प्रवृत्त करण्याचे कार्य प्रशासनाने हाती घेतले आहे.

ग्रामीण भागातील जनतेत कोविड लसीबाबत विविध शंका निर्माण झाल्याने लसीकरण कमी प्रमाणात होत आहे. अश्या लोकांच्या मनातील शंका दूर करून लस घेण्याकरिता जनजागृती करण्याचे व जनतेला लस घेण्यास प्रवृत्त करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, ब्लॉक मिशन व्यवस्थापन व तालुका वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गावपातळीवर गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोतवाल यांनी सुद्धा गावात जनजागृती करून गावात 100 टक्के लसीकरण केले पाहिजे याकरिता प्रबोधन करून जनतेला लसीकरण करीत तयार करावे अशी संकल्पना जिल्हाधिकारी यांनी मांडली आहे.

हे देखील वाचलंत का?

ब्राह्मणी फाट्याजवळ दारुची तस्करी करणा-याला अटक

सर्वात कमी किमतीत शेतीच्या कुंपणासाठी झटका मशिन उपलब्ध

Leave A Reply

Your email address will not be published.