आषाढी एकादशीला गुरुदेवनगरात रंगणार ‘‘भक्तिरंग-पांडुरंग’’

सोमवारी सूरसागर कलाक्षितिजची भजनसंध्या...

0

बहुगुणी डेस्क:  आषाढी एकादशीनिमित्त सोमवार 23 जुलैला नागपूर येथील गुरुदेवनगर, बास्केटबॉल मैदानाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात सायंकाळी 7 वाजता ‘‘भक्तिरंग-पांडुरंग’’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. सूरसागर कलाक्षितिजाची ही प्रस्तुती आहे. मुख्य गायक पंकज रंगारी आहेत. संगीत संयोजन व तबल्याची साथ ‘सूरसागर’ इंजि. सागर राऊत करणार आहेत. ‘‘भक्तिरंग-पांडुरंग’’ या विशेष भक्तिगीतांच्या मैफलीचे निरुपण सुनील इंदुवामन ठाकरे करतील.

‘‘भक्तिरंग-पांडुरंग’’ या कार्यक्रमात पारंपरिक संतपदांसह विविध अभंग आणि भक्तिगीतांचा आस्वाद घेता येईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती मंदिराच्या विश्वस्त मंडळाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.