जामनी येथे आज पुन्हा 5 जनावर दगावले, बळींची संख्या 35

वणी बहुगुणी इम्पॅक्ट: प्रशासनाच्या चमुने दिली गावाला भेट

0

सुशील ओझा, झरी: जामनी गावात जनावरांवर आलेल्या मरीने आज आणखी 5 जनावरांचे बळी घेतले. गेल्या 15 दिवसात शेतकऱ्यांचे 35 जनावरे अज्ञात आजाराने मृत्यू झाला. मात्र तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर ‘वणी बहुगुणी’ने सोमवारी याबाबत वृत्त प्रकाशीत करताच प्रशासन खळबळून जागे झाले. आज पंचायत समितीचे अधिकारी व पशुधन समितीने गावात जाऊन भेट दिली. दरम्यान जनावरांचे पोस्ट मॉर्टम करून आजाराचे निदान लवकरात लवकर करावे असे आदेशही देण्यात आले. दरम्यान उद्या यवतमाळ येथूनही एक चमू उद्या जामनी गावात दाखल होणार आहे.

गेल्या 15 दिवसांपासून जामनी गावातील जनावरांवर अज्ञात रोगाने थैमान घातले आहे. या रोगामुळे गाय, बैल व इतर जनावरांनी चारा खाणे बंद केले आहे. शिवाय जनावरांना मलाद्वारे रक्तस्त्राव होत आहे. जनावरांच्या आजाराबाबत झरी व पाटण येथील डॉक्टरांना माहिती देण्यात आली. डॉक्टरांनी गावात येऊन जनावरांची तपासणी केली व त्यांना औषधी दिल्या. परंतु एकही जनावर बरे झाले नाही. उलट तपासणीसाठी पशुपालकांचेच पैसे खर्च झाले.

या प्रकरणी आज 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता गटविकास अधिकारी सुधाकर जाधव, पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार, पंचायत समिती सदस्य नागोराव उरवते, पशुधन अधिकारी एस एस चव्हाण, एस डब्ल्यू जांभुळे यांनी जामनी गावाला भेट दिली. या पथकान मृत जनावरांचे सॅम्पल घेऊन तपासणी करीता पाठविणार आहे. तसेच दुपारी 4 वाजता नंतर शवविच्छेदन होत नसल्याने मंगळवारी मृत जनावरांचे शवविच्छेदन करणार असल्याची माहिती दिली.

दरम्यान मंगळवारी यवतमाळ येथूनही एक चमू जामनी गावात दाखल होणार आहे. आज प्रशासनाच्या चमुने जरी भेट दिली असली तरी जामनी या गावाचा प्रभार असलेले डॉक्टर एस एल राजगडकर हे त्यावेळी उपस्थित नव्हते.

‘वणी बहुगुणी’ इम्पॅक्ट
जामनी येथे अज्ञान रोगामुळे आतापर्यंत 35 जनावरे दगावली आहे. 10 ते 15 जनावरांची प्रकृती गंभीर आहे. यात पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्याबाबत आज सकाळी वणी बहुगुणीने बातमी पब्लिश केली होती. त्यानंतर प्रशासनाला जाग आली व आज प्रशासनाने बातमीची दखल घेत पावले उचलली आहे. याबाबत पशुपालकांनी ‘वणी बहुगुणी’चे आभार मानले आहे.

हे देखील वाचा:

जामनी येथे जनावरांवर अज्ञात रोग, 30 जनावरे दगावली

सोशल मीडियाच्या माध्यमातून अपघातग्रस्ताला मदत

Leave A Reply

Your email address will not be published.