जामनी येथे जनावरांवर अज्ञात रोग, 30 जनावरे दगावली

अनेक जनावरे मरणाच्या दारावर, पशुपालकांचे आर्थिक नुकसान

0

सुशील ओझा, झरी: येथून 2 किमी अंतरावर असलेल्या जामनी गावात गेल्या 15 दिवसात शेतकऱ्यांचे 30 जनावरे विविध आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर अनेक जनावरे आजारी असून मरणाच्या दारात आहे. काही पशुपालकाच्या एकाच घरी दोन जनावरे दगावली आहे. कोणत्या रोगामुळे जनावरे दगावत आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र उपचाराच्या नावाखाली पशुपालकांकडून 200- 300 रुपये घेतले जात आहे. जनावरांच्या मरीमुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

गेल्या 15 दिवसांपासून जामनी गावातील जनावरांवर अज्ञात रोगाने थैमान घातले आहे. या रोगामुळे गाय, बैल व इतर जनावरांनी चारा खाणे बंद केले आहे. शिवाय जनावरांना मलद्वारे रक्तस्त्राव होत आहे. जनावरांच्या आजाराबाबत झरी व पाटण येथील डॉक्टरांना माहिती देण्यात आली. डॉक्टर गावात येऊन जनावरांची तपासणी करून औषधी दिल्या. परंतु एकही जनावर बरे झाले नारी.

उपचारासाठी 200-300 रुपये
जनावरांच्या उपचारासाठी डॉक्टर येत आहे. मात्र दरवेळी 200-300 रुपये फिस घेऊनही कोणतेही जनावर बरे होत नाही आहे. असा आरोप पशुपालक करीत आहे. शिवाय जनावरांवर कोणता रोग आला हे देखील डॉक्टरांना अद्यापही कळलेले नाही. शासनांकडून जनावरांना मोफत उपचार का नाही ? असा सवाल शेतकरी करीत आहे. शिवाय पैसे खर्च करूनही जनावरे जगत नाही आहे. त्यामुळे पशुपालक त्रस्त आहे.

गावातील विनोद गाउत्रे यांच्या घरातील 2 जनावरे, विठ्ठल उपलवार 1, कुंडलिक खडसे 1, नामाजी लेनगुळे 1, मुरली जयस्वाल 1, वासुदेव गेडाम 1, शंकर वाघाडे 2, विठ्ठल गाउत्रे 1, विकास आत्राम 1, प्रकाश गुरनुले 2, कुंडलिक चौधरी 1, संतोष वासाके 1 व इतर  शेतकऱ्यांनाचे मिळून सुमारे 30 जनावरांचा मृत्यू झाला आहे. मुके यांचे 1 जनावर, विनोद गाउत्रे 2, तुळशीराम गाउत्रे 1, पुंडलिक खडसे 1, प्रमोद गाउत्रे 1, केशव सोनूले 1,अशोक अंकतवार 1, प्रकाश गुरनुले 1 जनावरे यांची परिस्थिती गंभीर आहे.

जनावरे दगावत असल्याने व आजारी असल्याने याचा मोठा फटका दुग्ध व्यावसायिकांना बसला आहे. पशुसंवर्धन विभागाने त्वरित या गंभीर आजाराची माहिती काढून जनावरांवर उपचार करावा. तसेच मृत झालेल्या जनावरांच्या मालकांना आर्थिक मोबदला शासनाने द्यावे अशी मागणी जामनी ग्रामवासी करीत आहे.

हे देखील वाचा:

Leave A Reply

Your email address will not be published.