शेतीचे काम करणा-या शेतक-यावर रानडुकराचा हल्ला
शेतकरी गंभीर जखमी, वनोजा (देवी) शिवारातील घटना
जितेंद्र कोठारी, वणी: शेतात काम करत असणा-या एका शेतक-यावर रान डुकराने हल्ला चढवला. वनोजा (देवी) शिवारात आज सोमवारी दिनांक 14 जून रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. हनुमान चिंधुजी आस्वले असे हल्ल्यातील जखमीचे नाव आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे.
हनुमान चिंधुजी आस्वले (30) हे वनोजा येथील रहिवाशी असून त्यांची गावलगत शेती आहे. नेहमीप्रमाणे ते आज शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. दरम्यान दुपारच्या सुमारास रानडुकराने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केला असता रानडुकर तिथून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच त्यांना वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्यावर तिथे प्राथमिक उपचार करण्यात आला. मात्र या हल्ल्यात त्यांना गंभीर इजा झाल्याने त्यांना चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
हे देखील वाचा: