खासदार असदुद्दीन ओवैसीवर भ्याड हल्ल्याचे वणीत निषेध
ओवैसी याना झेड सुरक्षा देणे व हल्लेखोरांवर कठोर कारवाईची एआयएमआयएमची मागणी
जितेंद्र कोठारी, वणी : ऑल इंडिया मजलिस -ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) चे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गुरुवारी उत्तरप्रदेशमध्ये जीवघेणा हल्ला करण्यात आला. एआयएमआयएम वणी शाखातर्फे खासदार ओवैसीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे तीव्र निषेध करण्यात आले आहे. ओवैसी याना झेड कॅटगरीची सुरक्षा देणे व हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एआयएमआयएम कार्यकर्त्यांनी केली आहे. याबाबत आज उपविभागीय अधिकारी वणी याना निवेदन देण्यात आले.
निवडणूक प्रचार मोहीम दरम्यान गुरुवार 3 फेब्रु. रोजी मेरठ ते दिल्ली मार्गावर छिजारसी टोल नाक्याजवळ ओवैसी यांच्या कारवर 2 अज्ञात हल्लेखोरांनी 4 राऊंड फायर केले. या हल्ल्यात खासदार ओवैसी थोडक्यात बचावले. काही महिन्यांपूर्वी ओवैसी यांचे दिल्ली येथील निवासस्थानी काही हल्लेखोरांनी तोडफोड केली होती.
एआयएमआयएम वणीतर्फे उपविभागीय अधिकारी वणी याना निवेदन देताना AIMIM वणी शहर अध्यक्ष आसीम हुसैन, युवा शहर अध्यक्ष शादाब अहमद, AIMIM वणी कार्यकारी सदस्य सैय्यद मुज़म्मिल साहब, शहबाज़ अहमद नसीमुद्दीन, साकिब खान, इमरान खान, खादिम मोहम्मद अनवर हयाती, सलमान खान, अरबाज़ शेख, अरहम अली तसेच कार्यकर्ता उपस्थित होते.
Comments are closed.