शेतकऱ्यांच्या हितासाठी भाजपचे गाव तिथे उपोषण

वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील 110 गावात शुक्रवारी झाले आंदोलन

जितेंद्र कोठारी, वणी: विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध समस्याना घेऊन भारतीय जनता पक्षातर्फे शुक्रवार 4 फेब्रुवारीला ‘गाव तिथे उपोषण’ आंदोलन करण्यात आले. वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यातील तब्बल 110 गावात आयोजित एक दिवसीय सांकेतिक उपोषण मंडपाला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

अतिवृष्टीमुळे बाधित शिंदोला व पुनवट मंडळाचा नुकसानभरपाई यादीत समाविष्ट करणे, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देणे, कृषी पंपाची विजतोडणी बंद करणे, भारनियमन बंद करणे व इतर समस्यांबाबत उप विभागीय अधिकारी यांना निवेदन दिले होते. परंतु शासनाने त्या मागण्यांवर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 4 फेब्रुवारीला विधानसभा क्षेत्रातील 110 गावातील ग्रामपंचायत व हनुमान मंदिरासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

या वेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विजय पिदूरकर, दिनकरराव पावडे, तारेंद्र बोर्डे, रवी बेलूरकर, संजय पिंपलशेंडे, गजानन विधाते, मंगलाताई पावडे, मंगलाताई ठाकरे, विजय गारघाटे, विजय झाडे, धनराज राजगडकर, शंकर बांदुरकर, अशोक सुर, सचिन खाडे, दिपक पाऊणकर, विठ्ठल कोडापे, वैभव कवरासे यांनी उपोषण मंडपाला भेट दिली.

Comments are closed.