ऑटोची दुचाकीला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

ब्राह्मणी फाटा येथे घडला अपघात

जितेंद्र कोठारी, वणी : भरधाव ऑटो दुचाकीवर आदळून पलटी झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वार इसमाला गंभीर दुखापत झाली तर ऑटोचालक किरकोळ जखमी झाला. वणी घुग्गुस मार्गावर ब्राहमनी फाटा येथे शनिवारी दुपारी 1 वाजता दरम्यान ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार तीनचाकी बजाज ऑटो क्रमांक (MH27AC8856) च्या चालकाने मद्य प्राशन करुन निष्काळजीपणे भरधाव वेगाने ऑटो चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीला धडक देऊन ऑटो रस्त्यावर पलटी झाला. यात दुचाकीस्वार संदीप बालाजी जुनघरी (35), रा. वनोजादेवी याचा पाठीला गंभीर दुखापत झाली. तर ऑटोचालकालाही किरकोळ मार लागली. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी पोहचले व जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हे देखील वाचा-  

True Care

अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या मजनूला नवी मुंबई येथून अटक

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!