भरधाव ट्रकची ऑटोला धडक: ऑटो चालक जागीच ठार

पळसोनी फाट्याजवळ झाला अपघात

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडवरील पळसोणी फाटा येथे एका कोळसा भरणाऱ्या ट्रक ने ऑटोला जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवार दिनांक 10 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.  
ऑटो चालक राम खिलावन बसई प्रसाद (34) हा राजूर येथील रहिवासी आहे. तो ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. रविवारी तो ऑटो घेऊन वणीत आला होता. रात्री 10 वाजताच्या सुमारास तो वणीवरून राजूर येथे ऑटोने (MH 29 V 8144) राजूरला जात होता. दरम्यान यवतमाळ रोड हून एक कोळसा भरलेला ट्रक (MH 34 AB 9523) लालपुलियाच्या दिशने येत होता.  
पळसोनी फाट्याजवळ या भरधाव ट्रकने ऑटोला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यात ऑटोचा चुराडा झाला. तर ऑटो चालक राम खिलावन बसई प्रसाद (34) रा. राजूर याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. 

शैतान येतोय… सिनेमाचा हॉरर आणि थ्रील अनुभवा सुजाता थिएटरमध्ये

Comments are closed.