तेलंगणातून महाराष्ट्रात होणारी रेतीची वाहतूक बंद करा

झरीचे प्रभारी तहसीलदार यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0

सुशील ओझा, झरी: यवतमाळ जिल्ह्यातील एकही रेतीघाट हर्रास झाला नाही. त्यामुळे नदी, नाल्यांतील रेतीचोरीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे शासनाच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. असाच प्रकार तालुक्यात सुरू असून यावर बंदी घालावी अशी मागणी प्रभारी तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. तालुक्यात तेलंगणातील रेतीची मोठी वाहतूक होत आहे. तेलंगाणातील होणाऱ्या रेती वाहतुकीमुळे यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या रेती घाटावर मोठा परिणाम होत आहे.

आदिलाबादच्या जिल्हाधिकारी यांनी ७ जुलै २०२० रोजी २० क्यूबिक मीटर अवैध रेतीसाठा जप्त करून लिलाव करण्यात आला. लिलाव केलेली रेती घेणाऱ्यास वाहतुकीकरिता पास उपलब्ध करून दिले. परंतु लिलावात घेतलेली रेती कायम ठेवून ठेवून दररोज ४० ते ५० ट्रॅक्टरद्वारे रेतीची चोरी करून तस्करी व चोरी करीत आहे. लिलाव केलेल्या रेतीच्या पासचा दुरुपयोग करून जिल्ह्यालगत असलेल्या पैनगंगा नदीपात्रातून उत्खनन करून शासकीय सुट्टीच्या दिवशी व दिवसरात्र चोरी करून विक्री करीत आहे.

दिवसरात्र ट्रक व ट्रॅक्टरद्वारे सुरू असलेल्या रेतीचोरीमुळे नदीकाठावरील घाटांचे मोठे नुकसान होऊन महसूल विभागाला महसुलचेही मोठे नुकसान होणार आहे. आदीलाबाद जिल्ह्यातील बदलापूर जैनत येथून होणारी रेती वाहतूक थांबवावी असे पत्र प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिले. परंतु अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने रेतीचोरट्यांची दादागिरी वाढली आहे.

तेलंगणातील बदलापूर येथून येणारी रेतीची बेभाव विक्री होत आहे. जनतेला लुटण्याचा गोरखधंदा सुरूच आहे. जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी स्वतः लक्ष घालावे व लिलाव झालेल्या रेतीचे मिळालेले पास महाराष्ट्रकरिता लागू आहेत किंवा नाहीत याची माहिती घेऊन सदर रेती वाहतूक बंद करावी व महसुलचा होणारे नुकसान थांबवावे. ही मागणीदेखील प्रभारी तहसीलदार रामचंद्र खिरेकर यांनी केली आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.