रवी ढुमणे, वणी: वणी परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण समृद्ध व्हावे व सांस्कृतिकीकरणाला चालना मिळावी या हेतुने शिवमहोत्सव समिती दरवर्षी व्याख्यानमाला आयोजित करते. यावर्षी 7 व 8 क्टोबर रोजी शनिवार व रविवारला सायंकाळी 6 वाजता वरोरा रोडवरील बाजोरिया लॉन्स येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
7 ऑक्टोबर शनिवारी स्मृतिशेष रामचंद्र जागोजी सपाट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. रमेश सपाट यांच्या सौजन्याने औरंगाबाद येथील इतिहाससंशोधक व विचारवंत चंद्रशेखर शिखरे यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वातंत्र्यवीर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. 8 ऑक्टोबर रविवारी स्मृतिशेष परमानंद रामचंद्रजी कापसे मुर्धोनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रामचंद्रजी कापसे यांच्या सौजन्याने व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफले जाणार आहे. रविवारी चंद्रशेखर शिखरे यांचे ‘महात्मा जोतिराव फुले आणि वर्तमानातील सांस्कृतिक संघर्ष’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्राला अध्यक्ष म्हणून वणी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय देरकर राहतील. उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार लगारे, पंचायत समिती वणीचे अधिकारी मा. राजेश गायनर, शिक्षक नीळकंठराव जुमनाके, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विजय खापने, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीलेशा अंकुश बलकी, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रीती राहुल खाडे, मराठा सेवा संघाचे वणी अध्यक्ष मा. मंगेश खामनकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
रविवारी सायंकाळी होणाऱ्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य विजय वाघमारे राहतील. मारेगाव येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. जीवन कापसे, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. इकबाल खलील, पंचायत समिती वणीच्या सभापती मा. लीशा गजानन विधाते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवरावजी बोढाले, पत्रकार संतोष कुंडकर, शंकरराव बोढाले, संभाजी ब्रिगेड वणीचे अध्यक्ष अनंत मांडवकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष अॅड. नीलेश चौधरी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. करमसिंग राजपूत, निमंत्रक कृष्णदेव विधाते, सदस्यगण विलास शेरकी, संजय गोडे, सुरेंद्र घागे, डॉ. अर्षद शहा, अशोक चैधरी, प्रा.अनिल टोंगे, मोहन हरडे, रविंद्र आंबटकर, विलास मेश्राम, जानू अजाणी, जयंत कुचनकार, विजय दोडके, संजय कालर, अजय धोबे व्यवस्थापन समितीत आहेत. या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. हे व्याख्यानमालेचे तिसरे वर्ष असून यापूर्वी गंगाधर बनबरे, स्मिता पानसरे तसेच विजय जावंधिया यांची व्याख्याने झाली आहेत.