बळीराजा चेतना अभियान अंतर्गत फवारणी सुरक्षा किटचे वाटप
56 ग्रामपंचायतीला वाटण्यात आली सुरक्षा किट
ज्योतिबा पोटे, मारेगाव: बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत मारेगाव तालुक्यातील 56 ग्राम पंचायतींना फवारणी संरक्षण किटचे वाटप करण्यात आले. स्थानिक पंचायत समिती कार्यालयात 500 किटचे वाटप करण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा होऊन तीन शेतकरी व एक शेतमजुराचा मृत्य झाला आहे. तर 70 च्या वर जणांना विषबाधा झालीये. या संपूर्ण घटनेने प्रशासन हादरून गेले आहे. त्यामुळे पुन्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून बळीराज चेतना अभियान अंतर्गत प.स. तर्फे एकूण 500 किटचे वाटप तालुक्यातील 56 ग्रा.पं. च्या ग्रामसचिवाना करण्यात आले.
या वेळी मारेगावचे तहसिलदार विजय साळवे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुनील तलवारे, पं.स. सभापती शीतल पोटे, जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर व 56 ग्रामपंचायतीचे ग्रामसचिव उपस्थित होते.
किटचे जरी वाटप करण्यात आले असले तरी यापुढे विषबाधेने कोणत्याही शेतकऱ्यांचा मृत्यु होणार नाही याची खबरदारी स्वत: शेतकरी व त्या भागातले कृषि सहाय्यक पटवारी यांना घ्यायची आहे. तेव्हाच बळीराजा चेतना अभियानाचा उद्देश तेव्हाच सफल होईल.