दुःखद : अभय उर्फ बाळू सोमलकर यांचे निधन

पंचायत समितीचे माजी सभापती, निष्ठावंत शिवसैनिक हरपल्याने वणीत शोक

जितेंद्र कोठारी, वणी : पंचायत समितीचे माजी सभापती व अभय उर्फ बाळू सोमलकर (48) यांचे शुक्रवार 24 जूनचे रात्री निधन झाले. आजारी असल्याने नागपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना काल मध्यरात्री त्यांचे निधन झाले.

वणी पंचायत समितीच्या सावर्ला गणातून सदस्य असताना अभय सोमलकर यांनी सभापती पद भूषविले. त्यानंतर त्यांची पत्नीसुद्दा पंचायत समिती सभापती पदावर होत्या. कट्टर शिवसैनिक असलेल्या बाळू सोमलकर यांच्या असमायिक मृत्यूने कुटुंब व मित्र परिवारमध्ये शोक व्याप्त झाला आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी तसेच बराच मोठा आप्त परिवार आहे. वणी बहुगुणी तर्फे श्रद्धांजली….💐

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!