ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बामर्डा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने गावकऱ्यांना ये जा करण्यासाठी असुविधा होता आहे. या संदर्भात गावातील गावकऱ्यांनी जि.प.सदस्य यांना रस्त्यावरिल पुल खचल्याने दुरस्ती साठी पाठपुरावा करावा म्हणून सांगितले मात्र प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. वेळेतच पुलाची दुरुस्ती न झाल्यास मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या दोन दिवसांमध्ये परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुराचे पाणी बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जोरदार पाऊस झाला त्याचा फटका मारेगाव तालुक्यातील बामर्डा या गावाला बसला असून बामर्डा येथील पुलाचा काही भाग कोसळल्याने इथले जनजीवन विस्कळित झाले आहे.
मुसळधार पावसामुळे पुलाची माती रस्त्यावर आली असून या गावाला रहदारीचा एकच मार्ग असल्यामुळे दळणवळण करतांना धोका निर्माण झाला आहे. सध्या शाळा कॉलेजचे दिवस आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना येणे जाणे करणे आता धोकादायक झाले आहे.
पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे दिनेश सोनूले, प्रमोद आसुटकर यांच्या शेतात पाणी शिरल्याने त्यांचे मोठ्या प्रमानात आर्थिक नुकसान झाले आहे. पुलासंबंधी गावकऱ्यांनी वारंवार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाला विनंत्या अर्ज केले होते. मात्र त्यांनी गावाच्या परिस्तितिकडे दुर्लक्ष केले.
या गावी जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे व गावामध्ये येजा करायचे म्हटल्यास तो रस्ता पार करून येजा करावे लागते.पण आता पूल कोसळल्यामुळे रस्ता पार करून जाणे अशक्य झाले आहे. त्याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास युवाशक्तीचे संचालक धनंजय आसुटकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलेला आहे .