जैन ले-आऊट येथे रामकथा सप्ताहाला सुरुवात

18 ते 24 डिसेंबरपर्यंत चालणार कार्यक्रम

0

गिरीश कुबडे, वणी: वणी येथील जैन ले-आऊटमधील हनुमान  मंदिराच्या  प्रांगणात राष्ट्रसंत  तुकडोजी  महाराज यांच्या  पुण्यतिथीनिमित्त  श्रीमद रामकथा  ज्ञानयज्ञ सप्ताहच्या  कार्यक्रमाचे  आयोजन   करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार  दि. 18  ते रविवार  24  डिसेंबर   2017  या कालावधीत होणार आहे.

आर्वी  येथील  रामायणाचार्य ह.भ.प.  श्री. रमेशजी  आखरे महाराज  यांच्या ओजस्वी वाणीतून  रामकथेचे  प्रवचनाचा कार्यक्रम  रोज  सकाळी  9  ते  12 आणि  सायंकाळी  3 ते  6 वाजेपर्यत सुरु  राहणार आहे.  तर  रोज  सायंकाळी  7 ते 8  या कालावधीत हरिपाठ होणार  आहे.

पालखी  महोत्सव  सोहळा शनिवार  दि.  23 डिसेंबर  2017 दुपारी. 2  वाजता  होणार असून या कार्यक्रमाची सांगता  24 डिसेंबर  सकाळी  11 वाजता  दहीहंडी  व काल्याच्या  किर्तनाने  होणार आहे. त्याच  दिवशी  सायंकाळी 5  वाजता  महाप्रसादाचे आयोजन  करण्यात  आले  आहे. परिसरातील   सर्व  रसिकमंडळीनी   कार्यक्रमाचा लाभ   घेण्याचे   आवाहन आयोजन  समितीने  केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.