आज वणीत सुप्रसिद्ध गायक हेमंत बृजवासी यांची भजन संध्या

संध्या. 6 वाजता शासकीय मैदानात रंगणार भव्य कार्यक्रम

निकेश जिलठे, वणी: श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त वणीत 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवारी दिनांक 15 ऑगस्ट रोजी सुप्रसिद्ध जगराता गायक, इंडियन आयडल फेम हेमंत बृजवासी यांच्या भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय मैदान पाण्याच्या टाकीजवळ संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. जयश्री कृष्ण जन्माष्टमी समिती वणी द्वारा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात वणीकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जय श्रीकृष्ण जन्माष्टमी समितीचे अध्यक्ष ऍड. कुणाल विजयकुमार चोरडिया यांनी केले आहे.

शनिवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता अमृत भवन येथे जय श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जन्मोत्वात भक्तीगीत व भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी दिनांक 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता गोपाळकाल्याचे आयोजन करण्यात आले आहे. तर संध्याकाळी 4 वाजता भव्य शोभा यात्रा काढली जाणार आहे. भव्य धुमाल पार्टी, वारकरी भजन, इत्यादी या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. पारंपरिक वाद्य, विविध देखावे इत्यादींच्या साथीने ही शोभायात्रा अमृत भवन येथून निघणार आहे. वणीतील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करून या शोभायात्रेची सांगता होणार आहे.

या जन्मोत्सवाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ऍड कुणाल चोरडिया यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  शुभम मदान, शाम लहरिया, उमेश पोद्दार, सुधीर तलसे, राहुल मुंजेकर, अभय नागतुरे, जयंत पांडे, सागर मदान, मयूर गोयनका, सत्यजीत ठाकूरवार, दीपक पाउनकर इत्यादी परिश्रम घेत आहे.

Comments are closed.