जितेंद्र कोठारी, वणी : नगरपालिका पथकाने वजनकाटे जप्त केल्यामुळे आक्रोशाने भाजीपाला विक्रेत्यांनी स्वतःचे ठेले रस्त्यावर उलटविले. रस्त्यावर भाजीपाल्याचे खच पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. तसेच तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही घटना आज रविवार 23 मे रोजी सकाळी 9 वाजताच्या दरम्यान शिवाजी चौक ते आंबेडकर चौक दरम्यान डॉ. झेंडाह यांच्या दवाखान्यासमोर घडली.
प्राप्त माहितीनुसार कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजने अंतर्गत महसूल, नगरपरिषद व पोलीस विभागाचे संयुक्त पथक शहरात गस्तीवर होते. दरम्यान पोस्ट ऑफिस समोरील रस्त्यावर अनेक भाजीपाला विक्रेते नियम मोडून एकाच जागी उभे राहून भाजीपाला विक्री करीत असल्यामुळे ग्राहकांची गर्दी दिसून आली. पथकातील अधिकाऱ्यांनी भाजीपाला विक्रेत्यांना एकाच जागी गर्दी करु नये अशी तंबी देऊन काही ठेल्यावरून वजनकाटे जप्त केले.
वजन काटे जप्त केल्यामुळे आक्रोश करीत भाजीपाला विक्रेत्यांनी पथकातील कर्मचाऱ्यांसोबत वाद घालून भाजी भरलेले स्वतःचे ठेले रस्त्यावर उलटवलेत. टॉमेटो, कोबी, पालक, शेंगा, मिरचीचे रस्त्यावर खच पडल्यामुळे वाहतूक काही काळ बाधित झाली. पथकप्रमुख न.प. मुख्याधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी भाजीपाला विक्रेत्यांची समजूत काढून वाद आटोक्यात आणले.
हेदेखील वाचा
एका लग्नाची ही निराळीच गोष्ट, अनाथ मुलीच्या लग्नात गहिवरले वऱ्हाडी….
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
मीदेखील वणीमध्ये शिक्षण घेतले- माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार