वणीत ‘भारत बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद

काही तुरळक अपवाद वगळता व्यापारी प्रतिष्ठाने बंद

0

जब्बार चीनी, वणी: देशातील विविध शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला वणी शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. काही तुरळक दुकानं व अत्यावश्यक सेवा वगळता अधिकाधिक व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेऊन लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान शहरातून मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि वणीकरांनी सहभाग घेतला.

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या तीन शेतकरी कायद्याविरोधात सध्या दिल्ली बॉर्डरवर शेतक-यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांतर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. वणीतील छ. शिवाजी महाराज चौकात सकाळी 10 वाजताच्या दरम्यान विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले. त्यानंतर मोर्चा काढण्यात आला.

हा मोर्चा खाती चौक, दीपक चौपाटी, सर्वोदय चौक, टागोर चौक, गांधी चौक, जटाशंकर चौक, आंबेडकर चौक असा मार्गक्रमन करीत याची सांगता छ. शिवाजी महाराज चौक इथे करण्यात आली. मोर्चामध्ये व्यापा-यांना व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. मोर्चा संपल्यावर मान्यवरांनी भाषण करीत आपली भूमिका स्पष्ट केली.

शहरातील मुख्य मार्केट असलेला गांधी चौक 90 टक्के बंद होता. तर आंबेडकर चौक येथील अर्धेअधिक दुकाने बंद होती. इतर भागातील काही तुरळक दुकाने, पानटपरी तसेच मेडिकल व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती.

या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, वंचित आघाडी, बसपा इत्यादी राजकीय पक्षासह विविध सामाजिक आणि शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. या व्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांनीही मोर्चात सहभागी होऊन आपले समर्थन दिले.

मोर्चानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनावर कॉ. शंकर दानव, कॉ. दिलीप परचाके, डॉ. महेंद्र लोढा, जयसिंग गोहोकार, अजय धोबे, मंगल तेलंग, अनिल हेपट, दिलिप भोयर, नंदू बोबडे, राजू तुराणकर, तेजराज बोढे, संदीप गोहोकर, सूर्यकांत खाडे, सौरभ वानखेडे, दिलिप अड्डे, राजभाऊ पाथ्रडकर, विवेक मांडवकर, प्रवीण खानझोडे, प्रमोद वासेकर, अशोक नागभीडकर, रवि कोठावार, गौतम जिवणे, रज्जत सातपुते, जनार्धन थेटे, प्रलय तेलतुंबडे, प्रशिल तामगाडगे, गीत घोष, विलास घोगरे, विप्लव तेलतुंबडे, टिकाराम कोंगरे, रामदास कुचनकर, सुनील वरारकर, ओम ठाकूर, प्रमोद लोणारे, भास्कर गोरे, शैलेश गुंजेकर, अजिंक्य शेंडे, सूरेश शेंडे इत्यादीच्या सही आहे.

हे पण वाचा….

नवीन वागदरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हे पण वाचा….

‘भारत बंद’ला मारेगावात उत्स्फुर्त प्रतिसाद

Leave A Reply

Your email address will not be published.