जागतिक सायकल दिनानिमित्त शुक्रवारी वणीत सायकल रॅली

अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शुक्रवारी दिनांक 3 रोजी जागतिक सायकल दिनानिमित्त वणीत भव्य सायकल रॅलीचे आयोजन कऱण्यात आले आहे. सकाळी 8 वा. शासकीय मैदान वणी येथून या रॅलीला सुरूवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, खाती चौक, गांधी चौक, संत गाडगे बाबा चौक, भगतसिंग चौक, सुभाषचंद्र चौक, टागोर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, टिळक चौक असे मार्गक्रमण करीत शासकीय मैदान येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. आरोग्य व पर्यावरण वाचविण्याचा संदेश या सायकल रॅलीतून देण्यात येणार आहे. स्माईल फाउंडेशन व पृथ्वी संवर्धन गाव चळवळ द्वारा या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी सागर जाधव – 7038204209, प्रणाली चिकटे -7020740660 संपर्क साधता येणार आहे. या रॅलीत अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे. 

Comments are closed.