भीषण अपघातात दोन ठार

करणवाडी फाट्यासमोरील घटना

0

नागेश रायपुरे, मारेगाव: दोन दुचाकीस्वार अपघातात ठार झाल्याची घटना तालुक्यातील करणवाडी फाट्यासमोर शनिवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान घडली. विजय रामभाऊ उईके (48) रा. धर्मशाळा वार्ड घाटंजी असे एका मृतकाचे नाव असून दुसऱ्याची मृतकाची ओळख पटली नाही.

प्राप्त माहिती नुसार बाईकने(MH 29 BK 9102) जात असताना दोन अज्ञात इसमाचा करणवाडी फाट्या समोर अपघात झाल्याची माहिती गावातीलच अमोल पांडे, आशीष ऊरकुडे, सुनील मोहितकर, किशोर कनाके यांना कळताच यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला कळवले. मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा एक इसम जागीच ठार झाला होता. तर एक वाचला होता.

दरम्यान या चार युवकांनी एकाला वाचवण्यासाठी तत्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करून त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केले. मात्र त्या दुसऱ्या इसमालाही डॉक्टरांनी मृत घोषीत केले. एका मृतकाच्या खिशातील लायसन्सवरून विजय रामभाऊ उईके अशी त्या मृतकाची ओळख पटली.

दुसऱ्या मृतकाची ओळख वृत्त लिहेपर्यंत पटली नव्हती. या दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिली, की ते स्लिप होऊन कोसळले, हे वृत्त लिहेपर्यंत कळू शकले नाही. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.