रॉन्ग साईड ऑटो चालवून दुचाकीला धडक देणा-या चालकाविरोधात गुन्हा दाखल

अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

जितेंद्र कोठारी, वणी: रॉन्ग साईडने चालणा-या एका ऑटोने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेल्या इसमाचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला. घटनेच्या तब्बल 23 दिवसानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन वणी पोलिसांनी अज्ञात ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार दि. 8 डिसेंबर 2022 रोजी वणी-घुग्गूस मार्गावर एक ऑटो (MH29 T7524) रॉन्ग साईडने घुग्गूसकडून वणी येत होता. त्याच वेळी एक महिला (MH29 BH4554) या ज्युपिटर कंपनीच्या मोपेडने घुग्गुसच्या दिशेने जात होती. दरम्यान जन्नत हॉटेलच्या जवळ रॉन्गसाईडने येणा-या ऑटोचालकाने ज्यूपीटर मोपेडला जबर धडक दिली.

या अपघातात मोपेड चालक महिला जखमी झाली. तर मोपेडवर मागे बसलेले नग्गन अब्दुल समद सिद्दीकी (52) रा. वार्ड नं 2 शिवाजी नगर माजरी यांना डोक्यावर व छातीवर गंभीर मार लागला.
जखमी व्यक्तीला उपचाराकरिता वणी येथील सुगम हॉस्पिटल व त्यानंतर चंद्रपूर येतील मेहरा हॉस्पिटल येथे हलवल्याने आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि. 9 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.

त्यामुळे सदर ऑटो चालकानी निष्काळजीपणे विरुद्ध दिशेने ऑटो चालवून नग्गन अब्दुल समद सिद्दीकी (52) यांच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार देण्यात आली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसानी अज्ञात ऑटो चालकाविरुद्ध कलम 279, 304 A,337,338 भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

आदर्श विवाह: तरुणाने केले विधवेशी लग्न

वणीतील ‘त्या’ गोळीबाराला झाले 49 वर्ष पूर्ण

Comments are closed.